युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत पाच नवीन भारतीय स्थळे

उदयगिरी लेणी, गिन्नौरगड, वाघ लेणींसह चंबळच्या मंदिर समुहाचा समावेश

भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशातील  आणखी 5 महत्त्वाच्या स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या ‘टेंटेटिव्ह लिस्ट“मध्ये समावेश झाला आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील चारस्थळे उदयगिरी लेणी, वाघ लेणीचित्रे, गिन्नौरगड किल्ला आणि चंबळ खोऱ्यातील मंदिर समूह यांचा समावेश आहे. तर पाचवी नोंद भारत आणि दक्षिण आफ्रिकेशी संबंधित ‘साइट्स ऑफ सत्याग्रह“ या संयुक्त प्रस्तावाची आहे. त्यामुळे भारताच्या टेंटेटिव्ह लिस्टमधील स्थळांची संख्या 78 झाली आहे.

उदयगिरी लेणी : गुप्तकालीनवारशाची साक्ष

विदिशा जिल्ह्यातील उदयगिरी येथे 20 शैलकृती लेणी आहेत. गुप्तकालीन आश्रयाखाली विकसित झालेल्या या संकुलात शिल्पकला, शिलालेख आणि धार्मिक वास्तूंचे महत्त्वपूर्ण अवशेष आहेत. भगवान विष्णूच्या वराह अवताराची भव्य शैलमूर्ती हे येथील प्रमुख आकर्षण आहे. उदयगिरी येथे गुहा, शिल्पकला, शिलालेख, नैसर्गिक भूभाग आणि धार्मिक उपासना यांचा एकत्रित विकास दिसतो.  त्यामुळे भारतीय हिंदू धार्मिक वास्तुकलेच्या सुरुवातीच्या औपचाािरिक स्वरुपाचा अभ्यास करण्यासाठी हे स्थळ महत्त्वाचे मानले जाते.

साइट्स ऑफ सत्याग्रह

या संयुक्त प्रस्तावात दक्षिण आफ्रिकेतील दोन आणि भारतातील 7 ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे. भारतातील स्थळांमध्ये चंपारण्य, साबरमती आश्रम, मणि भवन, हरिजन सेवक संघ, सेवाग्राम आश्रम, आगाखान पॅलेस आणि गांधी स्मृती यांचा समावेश आहे. या मालिकेत सत्याग्रहाच्या दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीपासून भारतातील त्याचा विकास आणि संस्थात्मक स्वरुपापर्यंतचा इतिहासा मांडला आहे. युनेस्कोच्या प्रस्तावानुसार ही स्थळं सत्याग्रहाच्या संकल्पनेपासून प्रयोग, विस्तार आणि संस्थात्मक रुपापर्यंतचा प्रवास दाखवतात.

गिनौरगड : गोंड राजवटीच्याइतिहासाचा ठेवा

रायसेन जिल्ह्यातील गिन्नौरगड हा गोंड राजांच्या प्रमुख किल्लेबंद केंद्रांपैकी एक होता, डोंगराळ भूभाग, दऱ्या आणि घनदाट वनराईचा नैसर्गिक संरक्षणासाठी केलेला वापर हे या किल्ल्याचे वैशिष्ट्या आहे. युनेस्कोच्या नोंदीनुसार तो राज गोंडाच्या मध्य भारतातील महत्त्वाच्या किल्लेबंद राजधानीचे प्रतिनिधित्व करता

वाघ लेणी :  प्राचीन भित्तिचित्रांचा अनमोल ठेवा

धार जिल्ह्dयातील वाघ लेणी त्यांच्या प्राचीन बौद्ध भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. लेण्यांमधील चित्रांमध्ये मानवी आकृती, वनस्पती, भूमितीय रचना आणि तत्कालीन जीवनशैलीचे दर्शन घडते.

चंबळ खोऱ्यातील मंदिर समूह

मुरैना जिल्ह्dयातील बटेश्वर, पदावली आणि ककर्मठ मंदिर समुहाचा या प्रस्तावात समावेश आहे. ही मंदिरे मध्ययुगीत मंदिर वास्तुकलेच्या विकासाची महत्त्वपूर्ण उदाहरणे मानली जातात.

महत्त्वाची नोंद

टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश म्हणजेच युनेस्को जागतिक वारसास्थळाचा अंतिम दर्जा मिळणे नव्हे. एखाद्या स्थळाला जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकनाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यापूर्वी ते  टेंटेटिव्ह लिस्टध्ये असणे आवश्यक असते. त्यामुळे या पाचही नव्या नोंदी सध्या संभाव्य जागतिक वारसास्थळे आहेत. अंतिम युनेस्को जागतिक वारसास्थळ दर्जा अद्याप मिळालेला नाही.

 

Comments are closed.