टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठाची रँकिंग जाहीर; टॉप 250मध्ये एकही हिंदुस्थानी संस्था नाही
जागतिक स्तरावर प्रतिष्ठsच्या मानल्या जाणाऱया टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे 2027 साठीची जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत पहिल्या 250 मध्ये एकाही हिंदुस्थानी संस्थेचा समावेश नाही. तर पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये देशातील केवळ तीनच विद्यापीठांना स्थान मिळवता आले आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनच्या क्रमवारीत देशातील 154 विद्यापीठांनी स्थान प्राप्त केले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 15 विद्यापीठे वाढली आहेत. त्यात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सने जागतिक पातळीवर 254 वे स्थान प्राप्त केले आहे. त्या खालोखाल सविता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसने 325 ते 350, शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सायन्सेसने 451 ते 500, जामिया मिलिया इस्लामिया आणि केआयआयटी युनिव्हर्सिटी यांनी 501 ते 550 या गटात स्थान प्राप्त केले आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 601 ते 650 या गटात स्थान मिळवले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे), अदानी इन्स्टिटय़ूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या विद्यापीठांनी 1001 ते 1200 या गटात स्थान मिळवले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ अव्वल
यंदा या क्रमवारीत 118 देशांतील २२९७ विद्यापीठांचा समावेश आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग 11व्या वर्षी जागतिक पातळीवर प्रथम जागा मिळवा केले आहे. त्या खालोखाल II स्थानी मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट बंद टेक्नॉलॉजी (एमआयटी), प्रिन्सटन विद्यापीठ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठ विभागून तिसऱया स्थानी आहे.
जगातील टॉप 5 विद्यापीठे
1 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी – युनायटेड किंगडम
2 मॅसाच्युसेट्स इंस्टिटय़ूट – अमेरिका
3 प्रिंसटन युनिव्हर्सिटी – अमेरिका
4 स्टेनपर्ह्ड युनिव्हर्सिटी – अमेरिका
5 पॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी – युनायटेड किंगडम
Comments are closed.