देश विदेश – व्यावसायिक सिलिंडर 70 रुपयांनी महाग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

1 ऑक्टोबर 2026 पासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 70 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च काही प्रमाणात वाढेल. त्यामुळे ते चहा, नाश्ता महाग करू शकतात. लग्न समारंभातील पॅटरिंगही महाग होऊ शकते. सिलिंडरमध्ये 70 रुपयांची वाढ झाल्याने मुंबईत सिलिंडरची किंमत 2 हजार 76 रुपये झाली आहे. ती आधी 2 हजार 701 रुपये होती. तर कोलकातामध्ये 2 हजार 954 रुपये किंमत झाली आहे. आदी 2 हजार 884 रुपये होती.

अफगाणिस्तात हल्ला, 9 जणांचा मृत्यू

पाकिस्तानने गुरुवारी अफगाणिस्तानच्या पुनार आणि हेलमंड प्रांतात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. हल्ल्यांमध्ये दोन्ही प्रांतांतील तीन घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेला हा 11 वा हल्ला होता. वृत्तांनुसार, या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे जबीहुल्लाह मुजाहिद यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

झिम्बाब्वेत हेलिकाॅप्टर दुर्घटनेत 6 ठार

झिम्बॉब्वेमध्ये सहा जणांना घेऊन जाणारे हेलिका@प्टर कोसळले. या हेलिका@प्टरमध्ये चार प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. या अपघातात या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रसिद्ध व्यावसायिक विकनेल चिवायो आणि त्यांची पत्नी लुसी मुतेके यांचाही समावेश आहे. राजधानी हरारेपासून 70 किमी पूर्वेला असलेल्या मरोनडेरा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील. विकनेल चिवायो हे इंट्राट्रेक झिम्बाब्वेचे संस्थापक होते.

Comments are closed.