संतोष देवरूखकर प्रभाग समितीवर
संतोष देवरूखकर यांची मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग प्रभाग समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
जी/उत्तर प्रभाग समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विद्यमान समितीच्या संपुष्टात आलेल्या प्रभाग समितीवर पालिका अधिनियमनानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जी/उत्तर प्रभाग समितीकडून देण्यात आली आहे.
महापालिका अधिनियम 1888चे कलम 50चे पोटकलम (2) खंड (क) अन्वये ही नियुक्ती करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. देवरूखकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Comments are closed.