शिवाजी पार्कातील सीजेपीच्या आंदोलनात तरुणाईच्या हातातील पोस्टरने वेधले लक्ष
कॉक्रोच जनता पार्टी आज शुक्रवारी (2 ऑक्टोबर) दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ज्ञानेश कुमारांच्याविरोधात, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता ‘जेल भरो’ आंदोलन करत आहे. या आंदोलनाला सायंकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे. परंतु, सकाळपासूनच या आंदोलनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात तिरंगा आणण्यात आले आहे. ज्याची तयारी सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तर, आंदोलनस्थळी भाषणासाठी तयार करण्यात आलेला ट्रक लक्ष वेधून घेत आहे. पोलिसांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी भाषणासाठी स्टेज उभारण्यास परवानगी न दिल्याने या ठिकाणी मोठा ट्रक आणण्यात आला. या ट्रकवर “गद्दार ग्यानू मस्ट गो, सेव्ह डेमोक्रसी” म्हणजेच ‘गद्दार ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, लोकशाही वाचवा’ अशा आशयाचा बोर्ड ट्रकवर लावण्यात आला आहे. परंतु, या ठिकाणी तरुणाईने आणलेल्या पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Comments are closed.