आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती, 500 टॉपर्स विद्यार्थ्यांपैकी 183 जणांनी घेतला प्रवेश
आयआयटी जेईई 2026 मध्ये टॉपर्स ठरलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपली सर्वाधित पसंती आयआयटी मुंबईला दिली आहे. टॉप 100 मधील 68 आणि टॉप 500 पर्यंत रँक मिळवलेल्या 183 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला आहे, अशी माहिती संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अहवालातून समोर आली आहे.
या अहवालानुसार, देशातील 23 आयआयटीपैकी जुन्या 7 संस्थांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम आहे. जेईई ऍडव्हान्समध्ये टॉप- 5 हजार रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2,460 विद्यार्थ्यांनी याच संस्थांमध्ये प्रवेश घेतला. तसेच, टॉप-500 मधील एकाही विद्यार्थ्याने इंदूर, मंडी, भुवनेश्वर, जोधपूर, गांधीनगर, पाटणा, धनबाद, रोपड आणि वाराणसीसह 15 आयआयटीमध्ये प्रवेश घेतला नाही. टॉपर्सची पहिली पसंती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग राहिली. टॉप-500 पैकी 365 म्हणजेच 73 टक्के विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आयआयटीमध्ये सीएसई निवडले आहेत. यापैकी सर्वाधिक 142 विद्यार्थ्यांनी आयआयटी मंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्स घेतले. याच्या तुलनेत सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये टॉप-500 पैकी केवळ 2 म्हणजेच 0.4 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. टॉप-500 मधील कोणत्याही विद्यार्थ्याने एरोस्पेस इंजिनीअरिंग निवडले नाही. तसेच, एआय अँड डेटा ऍनालिटिक्समध्ये 17 आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
शुभम कुमारने निवडले आयआयटी दिल्ली
देशात पहिली रँक मिळवणाऱया शुभम कुमारसह टॉप-10 मध्ये असलेल्या 5 विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. मुलींमध्ये अव्वल ठरलेल्या आरोही देशपांडेने हिने आयआयटी दिल्लीची निवड केली. तिची रँक 77 होती. मद्रास झोनमध्ये प्रवेश घेणाऱया मुलींची संख्या सर्वाधिक असून या ठिकाणी 4 हजार 796 पैकी 1260 जागा मुलींनी काबीज केल्या.
आयआयटी टॉप-500 टॉप-5000
मुंबई 183 764
दिल्ली 115 587
मद्रास 78 477
कानपूर 49 454
खडकपूर 40 482
रुरकी 16 411
गुवाहाटी 0 285
कोर्स टॉप-500
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी 365
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग 58
यांत्रिकी अभियांत्रिकी 38
गणित आणि संगणन 1
केमिकल इंजिनीअरिंग 0
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन 0
इंजिनीअरिंग फिजिक्स 1
इलेक्ट्रो आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन 0
एअरोस्पेस इंजिनीअरिंग 0
एआय आणि डेटा विश्लेषण 17
सिव्हिल इंजिनीअरिंग 2
Comments are closed.