संत करमोतीबाई, कृष्णभक्त
लहानपणापासून विरक्त स्वभाव असलेल्या आणि वृंदावनात राहणाऱ्या संत कर्मोतिबाई. त्यांना कृष्णभक्तीचे प्रचंड वेड होते. त्यांचा विवाह बालपणीच झाला होता. स्वतःला गोपी समजणाऱ्या कर्मोतिबाईंना त्यांचे पती न्यायला आले तेव्हा त्या घर सोडून गेल्या. वृंदावनात जाऊन त्या तपश्चर्येसाठी जागा शोधू लागल्या. वृंदावनातील ब्रह्मकुंडावर बसून त्यांनी तपश्चर्या केली. एक दिवस अचानक पतीसकट घरची सगळी मंडळी शोध घेत तिथे आली. त्यांच्यावर दोषारोप झाले. पण त्या पुरत्या कृष्णभक्तीत लीन झाल्या होत्या. त्यांनी सांगितले, ‘हरिभक्ती हेच नरदेहाचे नाव आहे. बाकी सगळा मोह आहे. मग दुःख कशाचे करायचे?’ तेव्हा त्यांच्या वडीलांनी त्यांच्यातील संतत्व ओळखून त्यांना नमस्कार केला. आजही वृंदावनात ब्रह्मकुंडावर संत कर्मोतिबाईंची कुटी आहे. संत कर्मोतिबाईंचे चरित्र आजही वृंदावनात आनंदाने गायले जाते.
Comments are closed.