जोगेश्वरीच्या बालविकास विद्यामंदिरचा हीरक महोत्सव, शिक्षकांच्या योगदानाचा भव्य गौरव; संस्थेच्या वेबसाईटचे लोकार्पण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संचालित जोगेश्वरी येथील बालविकास विद्यामंदिरचा हीरक महोत्सवाचा शुभारंभ मोठय़ा दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचा गौरव आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या आकर्षक सादरीकरणातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. उपमहापौर संजय घाडी, शाळेचे माजी विद्यार्थी आणि आमदार अनंत नर आणि नगरसेविका नाजिया सोफी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेच्या वेबसाईटचे तसेच हीरक महोत्सवानिमित्त तयार केलेल्या स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मोतीराम विश्वासराव, कार्याध्यक्ष सहदेव सावंत, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर यावेळी उपस्थित होते.

Comments are closed.