शहर भयमुक्त व्हावे म्हणून ठाणेकर मोर्चा काढत असतील तर ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईजवळ एका जिल्ह्यातील जनता शहर भयमुक्त व्हावे म्हणून मोर्चा काढत असेल तर ही सरकारसाठी, खास करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते रविवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यात संतापाचा स्फोट झाला असून शहरात रोज पडणारे खून, फोफावलेली गुन्हेगारी, खंडणीखोर – ड्रग माफियांचे थैमान आणि राजकीय दहशतीविरोधात सर्वपक्षीयांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, आप आणि आरपीआयच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात हजारो ठाणेकर सहभागी होणार असून कायदा-सुव्यवस्थेच्या निघालेल्या धिंडवडय़ांचा सरकार आणि पोलिसांना जाब विचारला जाणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ठाणे हे कधीकाळी शांत, विनम्र, संयमी, संस्कारी आणि सुसंस्कृत होते. पुण्यानंतर सांस्कृतिक राजधानी म्हणून ठाण्याचे नाव घेतले जात होते. ते ठाणे भयमुक्त करण्यासाठी मोर्चे आणि आंदोलन करावे लागत असेल तर यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांची माफी मागितली पाहिजे. कारण यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही गुंडांना पोसताय, गुंडांना पाळणारे माफिया सरकारमध्ये बसलेले असून तुम्ही त्यांना प्रतिष्ठा देत आहात, असेही संजय राऊत म्हणाले.

पुर्णेकरांच्या हत्येने संतापाचा स्फोट; भयमुक्त ठाण्यासाठी 9 ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयावर मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची घोषणा

Comments are closed.