Live Update – कुणाला सत्तेवर आणि कुणाला विरोधात बसवायचे हे लोकांनी ठरवावे; निवडणूक आयोगाने नाही – राज ठाकरे

भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत शिवसेना-मनसेची गगनभेदी ‘गर्जना’ घुमणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते महापालिका अशा विचार मोर्चाला सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत असून शिवसैनिक, मनसैनिकांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • ज्ञानेश कुमार हे भ्रष्ट कारभाराचे प्रतिक आहे. 2014 पासूनचा कालखंड हा देशाच्या इतिहासात काळा कालखंड म्हणून ओळखला जाईल – बाळासाहेब थोरात
  • मतचोरीतून भाजपने विजय मिळवला. आपली आजची ही गर्जना देशात जाणार आहे – बाळासाहेब थोरात
  • संपूर्ण देशात असंतोष असून भाजप सत्तेसाठी काहीही करेल. निवडणूक आयोग हा आपला गुलाम असला पाहिजे त्या दृष्टीने भाजपने पाऊल उचलले – बाळासाहेब थोरात
  • ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातून क्रांती झाली त्यावेळी हुकुमशहाला देशातून जावे लागले – शशिकांत शिंदे
  • भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाचे समर्थन करते. आम्ही ज्या यंत्रणेविरुद्ध लढतोय त्याचे तुम्ही समर्थन करताय याचा अर्थ ती तुमची बी टीम आहे – शशिकांत शिंदे
  • पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे आणि प्रत्येक राज्यात पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे – अनिल देशमुख
  • निवडणूक आयोगाविरोधात देशभरात आक्रोश आहे. तरुण-तरुणी याविरोधात आवाज उठवत आहेत. घोटाळेबाज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना तुरुंगात टाका अशी जनतेची मागणी – अनिल देशमुख
  • गर्जना मोर्चाला तुफान गर्दी, तिरंग्याखाली एकवटली जनता

  • जालन्याचे शिवसैनिक मनोज निर्मल हे गर्जना मोर्चात गब्बरच्या वेशभुषेत दिसले
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी

  • मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळी दाखल
  • उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता आंदोलकांना सफेद टोपी व मुबलक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे.

  • गर्जना मोर्चास्थळी तरुणाने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष
  • चाटेशकुमार हटाओ, देश बचाओ… आली रे आली, ज्ञानुची बारी आली… अशी घोषणाबाजी.
  • गर्जना मोर्चास्थळी नागरिक वेगवेगळे लक्ष्यवेधक पोस्टर घेऊन हजर

  • ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा! गर्जना मोर्चास्थळी जेनझींच्या टीशर्टने वेधले लक्ष
  • भ्रष्ट निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध ‘गर्जना’ मोर्चाला प्रचंड गर्दी, तुफान घोषणाबाजी
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना
  • डुप्लिकेट ज्ञानेश कुमार यांना घेऊन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे शिवसैनिकांसह गर्जना मोर्चाकडे रवाना
  • ज्ञानेश कुमार राजीनामा द्या… आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी

Comments are closed.