कुणाला सत्तेवर आणि कुणाला विरोधात बसवायचे हे लोकांनी ठरवावे; निवडणूक आयोगाने नाही – राज ठाकरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया, मतदार याद्यांमधील घोळ, ईव्हीएम मशीन अशा विविध गोष्टींना लक्ष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. निवडणूक आयोगाविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा समाचार घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘सत्ताधाऱ्यांविषयी आम्हाला कुठली असूया नाही, आम्हाला कुठचा राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहात. मात्र तुम्ही सत्ता कशी राबवताय आणि कशातून राबवताय त्याचा राग आहे’. तसेच ‘या देशातील मतदारांनी ठरवावे कुणाला निवडून द्यायचे, कुणाला सत्तेवर बसवायचे, कुणाला विरोधी पक्षात बसवायचे. लोकांनी ठरवावे, निवडणूक आयोगाने नाही’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्याविरोधात मुंबईमध्ये आयोजित विराट गर्जना मोर्चामध्ये ते बोलत होते.

Comments are closed.