Live Update – भ्रष्ट निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध ‘गर्जना’, हजारोंच्या संख्येने आंदोलक मेट्रो सिनेमाजवळ दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत थोड्याच वेळात शिवसेना-मनसेची गगनभेदी ‘गर्जना’ घुमणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते महापालिका असा विराट मोर्चा निघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असून शिवसैनिक, मनसैनिकांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना
  • डुप्लिकेट ज्ञानेश कुमार यांना घेऊन शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे शिवसैनिकांसह गर्जना मोर्चाकडे रवाना
  • ज्ञानेश कुमार राजीनामा द्या… आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी

Comments are closed.