‘दृश्यम 3’ ची दोन दिवसांत 114 कोटींची कमाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘दृश्यम 3’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमापूळ घातला आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने 114 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे. या वर्षी ‘धुरंधर 2’ नंतर सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 3’ या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रीया सरन, प्रकाश राज, कमलेश सावंत, जयदीप अहलावत, इशिता दत्ता अशी तगडी स्टारकास्ट आहे. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 62 कोटी तर दुसऱ्या दिवशी 52 कोटी रुपयांची बंपर कमाई केली. रविवारीदेखील हा चित्रपट 50 कोटींहून अधिक कमाई करेल, अशी आशा चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.