चीनचा दबदबा, पण जपान सुसाट! चीनची 42 पदकांची घसरण तर जपानची 72 पदके वाढली
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेवरही चीनचाच दबदबा कायम राहिला. मात्र यजमान जपानने नागोयात सुसाट धावत पदकांची अशी लयलूट केली की हांगझोऊच्या तुलनेत त्याच्या खात्यात तब्बल 81 पदकांची भर पडली. हिंदुस्थानचे पदकशतक हुकले असले तरी अखेरच्या दोन दिवसांत 11 सुवर्णांची कमाई करीत त्याने चौथे स्थान कायम राखले.
चीनने हांगझोऊमध्ये 201 सुवर्णांसह 383 पदके जिंकली होती. मात्र नागोयात त्यांच्या सुवर्णांची संख्या 169 वर घसरली तर एपूण पदकांचा आकडाही 341 वर थांबला. म्हणजे गतस्पर्धेपेक्षा 42 पदकांची घट झाली. दुसरीकडे यजमान जपानने आपल्या घरच्या वातावरणाचा फायदा उठवत सुमारे 72 पदके अधिक जिंकली. गेल्या वेळी हांगझोऊत त्यांनी 188 पदके जिंकली होती, तर यावेळी नागोयात थेट 269 पदकांपर्यंत झेप घेत चीनसमोर आव्हान उभे केले. त्याने सुवर्णपदकेही 52 वरून 83 वर नेली. म्हणजे एपूण पदकांत 81 आणि सुवर्णात 31ची भर घालत त्यांनी आपला जोरदार खेळ दाखवला.
दक्षिण कोरियाची गाडी मात्र रुळावरून घसरली. 2023 मध्ये 190 पदके आणि 42 सुवर्ण जिंकणाऱया कोरियाला यंदा 150 पदकांवर आणि 39 सुवर्णांवर समाधान मानावे लागले. एपूण पदकांत तब्बल 40 ची घट झाली.
हिंदुस्थानचीही घसरण झाली, पण कहाणी वेगळी होती. हांगझोऊतील 107 पदकांच्या तुलनेत यंदा 85 पदके आणि सुवर्ण 28 वरून 21 झाली. मात्र शेवटच्या दोन दिवसांत केलेल्या कामगिरीने हिंदुस्थानची मान उंचावली.
Comments are closed.