मोठी बातमी! ICC ची भारत-वेस्ट इंडिजवर कारवाई, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केली 'ही' चूक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान संथगतीने षटके टाकल्याबद्दल दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने सोमवारी (५ ऑक्टोबर) हे जाहीर केले.
भारत आणि वेस्ट इंडिजने अनुक्रमे चार आणि दोन षटके कमी टाकल्यामुळे, भारताला त्यांच्या सामना शुल्काच्या २०% तर वेस्ट इंडिजला १०% दंड ठोठावण्यात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी (३ ऑक्टोबर) चंदीगड येथे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याने आयसीसीने दोन्ही संघांना शिक्षा केली आहे.
हे आरोप मैदानातील पंच जयरामन मदनगोपाल आणि सॅम नोगज्स्की, तिसरे पंच शरफुद्दुला इब्ने शाहिद आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी केले होते. त्यानंतर आयसीसी आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलचे प्रकाश भट्ट यांनी हे निर्बंध लादले.
तसेच दोन्ही कर्णधारांनी गुन्हे कबूल केले आणि प्रस्तावित शिक्षा स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.
मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला होता. भारताने दिलेल्या ३५२ धावसंख्येचे लक्ष्य त्यांनी पार केले आणि विक्रमी विजय मिळवला. त्यांचा हा पुरुष एकदविसीय सामन्यांमधील सर्वोच्च यशस्वी धावांची पाठलाग ठरला. यामध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप १६२ धावा करून नाबाद राहिला. तोच या सामन्याचा सामनावीर ठरला.
आता दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भिडणार आहे. ही मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. (ICC sanctioned India and West Indies both due to slow over rate during third ODI)
Comments are closed.