नायजेरियात भीषण दुर्घटना, 32 जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नायजेरियात सोमवारी भीषण विमान दुर्घटना घडली आहे. सुमारे 32 जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले. घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ओंडो राज्यातील इग्बोकोडा परिसरात हे विमान कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, ATR-42 हे विमान नायजेरियाचे आर्थिक केंद्र असलेल्या लागोसकडे नियमित मोहिमेवर जात असताना दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात 25 प्रवासी आणि 7 कर्मचारी होते, असे नायजेरियाचे हवाई वाहतूक मंत्री फेस्टस केयामो यांनी एका निवेदनात म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमान प्रथम रडारवरून गायब झाले आणि इडो राज्यातून लागोसला जात असताना प्रवासादरम्यान ते कोसळल्याचे निश्चित झाले, असे केयामो यांनी नमूद केले.

Comments are closed.