हाँगकाँग सिक्सेससाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर, भुवनेश्वर कुमारला कर्णधारपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भुवनेश्वर कुमार सातत्याने चांगली कामगिरी करून बऱ्याच काळापासून हिंदुस्थानच्या संघाबाहेर आहे, पण भुवनेश्वरला आता हिंदुस्थानच्या संघाचे कर्णधार पद मिळाले आहे. हाँगकाँग सिक्सेससाठी त्याला हिंदुस्थानच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान हाँगकाँगमध्ये खेळवली जाणार आहे.

भुवनेश्वरने 2022 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे, पण तरीही त्याचा हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. पण आता त्याला थेट हाँगकाँग सिक्सेससाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.

हाँगकाँग सिक्सेसचे फॉर्म काय असते…

हाँगकाँगच्या मोंगकॉक येथील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राऊंडवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहा-सहा खेळाडूंचे सामने असतात. हाँगकाँग सिक्सेसमधील प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात आणि ही स्पर्धा क्रिकेट सामन्याचा थरार एका वेगवान स्वरूपात सादर करते.

हिंदुस्थानचा संघ ः

भुवनेश्वर कुमार (कर्णधर), कृणाल पंड्या, शशांक सिंग, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, टी नटराजन.

भुवनेश्वरला शक्तिशाली अनुभव

भुवनेश्वरला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये नव्या चेंडूने प्रभावीपणे गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. कृणाल एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात वैविध्य आणतो. नितीशकडे आक्रमक फलंदाजी आणि सलामीच्या फळीत खेळण्याचा अनुभव आहे. शशांक आणि तेवतिया सामने जिंकून देण्याची आपली क्षमता दाखवतात. त्रिपाठी आक्रमकपणे खेळतो आणि नटराजन एक डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून एक अनोखा पर्याय उपलब्ध करून देतो.

Comments are closed.