भारतीय शास्त्रज्ञांनी स्केट फिशच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत.

केरळ किनाऱ्याजवळ 400 ते 600 मीटर खोलवर आढळला

अरबी समुद्राच्या खोल पाण्यात भारतीय वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण (झेडएसआय), आयसीएआर-केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या संयुक्त संशोधनातून स्केट माशाची नवी प्रजाती शोधण्यात आली आहे. ‘डिप्टुरस धृतिया’ असे या नव्या प्रजातीचे वैज्ञानिक नामकरण करण्यात आले असून तिला ‘अरेबियन स्केट’ असे सामान्य नाव देण्यात आले आहे. केरळ किनाऱ्याजवळ तसेच वेज बँक परिसरात 400 ते 600 मीटल खोलीवर तिचे नमुने आढळून आले आहेत.

13.1 सेंटीमीटरपर्यंत लांबी

या प्रजातीची कमाल ज्ञात लांबी 131.5 सेंटीमीटर असून तिच्या शेपटीवरील काट्यांच्या 5 स्पष्ट रांगा हे तिचे प्रमुख वैशिष्ट्या आहे. आनुवांशिक ओळख पटविण्यासाठी वैज्ञानिकांनी तिच्या संपूर्ण मायटोकॉन्ड्रियल जीनोमचे अनुक्रमण केले आहे.

दीर्घकाळ चुकीची ओळख

विशेष म्हणजे या माशाला 4 दशकांहून अधिक काळ ‘डिप्टुरस स्प्रिंगेरी’ समजले जात होते. नव्या आनुवांशिक अभ्यासातून ती ‘ट्रावनकोर स्केट’पासून वेगळी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.

नामकरण

झेडएसआयच्या पहिल्या महिला संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांच्या सन्मानार्थ या नव्या प्रजातीला ‘डिप्टुरस धृतिया’ हे नाव देण्यात आले आहे. वैज्ञानिकांसाठी या शोधाचे महत्त्व मोठे आहे. खोल समुद्रातील शार्क, रे आणि स्केटसारख्या प्रजातींची संख्या, वितरण आणि आनुवांशिक वैशिष्ट्यो समजून घेणे त्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन कार्यरत झेडएसआयचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

Comments are closed.