IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज निवड समितीची महत्वाची बैठक! एकाच वेळी 4 संघांची घोषणा होणार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आता टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर (Team india Newzealand tour) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 5 टी-20 आणि 5 वनडे सामने खेळायचे आहेत. त्यानंतर 2 कसोटी सामनेही होणार आहेत. याशिवाय कसोटी मालिकेच्या तयारीसाठी इंडिया ‘A’ संघ 3 मल्टी-डे सामने खेळणार आहे. या चारही मालिकांसाठी आजच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आयसीसी (ICC) वनडे वर्ल्ड कप 2027 साठी टीमची दिशा या मालिकेतून स्पष्ट होऊ शकते. त्याचबरोबर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या अंतिम फेरीत प्रवेशाच्या दृष्टीनेही हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि टीम इंडियाचे निवडकर्ते खेळाडूंच्या निवडीबाबत खूप विचारपूर्वक निर्णय घेतील, जेणेकरून स्टार खेळाडूंना दुखापतीची समस्या निर्माण होऊ नये.

भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खऱ्या अर्थाने मोठी परीक्षा ठरणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंची परीक्षा होणार आहे. त्यातच सलग मालिका असल्यामुळे कोणत्याही खेळाडूसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे जवळपास अशक्य ठरणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंनाही संधी मिळू शकते. मात्र, चाहते जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आता वनडे फॉरमॅटमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे BCCI आणि निवडकर्ते त्याला टी-20 फॉरमॅटमधून विश्रांती देऊ शकतात.

टी20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी20: 22 ऑक्टोबर क्राइस्टचर्च दुपारी 1:30 वाजता

दुसरा टी20: 24 ऑक्टोबर क्राइस्टचर्च दुपारी 1:30 वाजता

तिसरा टी20: 27 ऑक्टोबर वेलिंग्टन दुपारी 1:30 वाजता

चौथा टी20: 30 ऑक्टोबर ऑकलंड दुपारी 1:30 वाजता

शेवटचा टी20: 1 नोव्हेंबर हॅमिल्टन दुपारी 1:30 वाजता

वनडे मालिका वेळापत्रक:-

पहिला वनडे: 4 नोव्हेंबर ऑकलंड सकाळी 8:30 वाजता

दुसरा वनडे: 7 नोव्हेंबर वेलिंग्टन सकाळी 8:30 वाजता

तिसरा वनडे: 10 नोव्हेंबर हॅमिल्टन सकाळी 8:30 वाजता

चौथा वनडे: 13 नोव्हेंबर माउंट माउंगानुई सकाळी 8:30 वाजता

पाचवा वनडे: 15 नोव्हेंबर माउंट माउंगानुई सकाळी 8:30 वाजता

कसोटी मालिका वेळापत्रक:-

पहिला कसोटी: 19–23 नोव्हेंबर वेलिंग्टन सकाळी 4:30 वाजता

दुसरा कसोटी: 27 नोव्हेंबर–1 डिसेंबर क्राइस्टचर्च सकाळी 4:30 वाजता

इंडिया ‘A’ संघाचे वेळापत्रक:-

पहिला 4-दिवसीय सामना:- 24–27 ऑक्टोबर 2026 बर्ट सटक्लिफ ओव्हल, लिंकन

दुसरा 4-दिवसीय सामना:- 31 ऑक्टोबर–3 नोव्हेंबर 2026 हेगली ओव्हल, क्राइस्टचर्च

तिसरा 4-दिवसीय सामना 7–10 नोव्हेंबर 2026 बर्ट सटक्लिफ ओव्हल, लिंकन.

Comments are closed.