राजपाल यादव यांना 'सर्वोच्च' दिलासा नाही.
13 रोजीपर्यंत 2 कोटी जमा करण्याचा आदेश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
धनादेश न वटल्याप्रकरणी अभिनेते राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने तक्रारदाराला देय असलेल्या रकमेतून 2 कोटी रुपये 13ऑक्टोबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश राजपाल यादवांना दिले आहेत. ही रक्कम जमा केल्यानंतरच उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार केला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट पेले. राजपाल स्वत: न्यायालयात उपस्थित होते आणि त्यांनी 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोबत आणला होता. उर्वरित 85 लाख रुपये मालमत्ता खरेदीदारामार्फत जमा केले जाणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.वारंवार मुदत देण्यामागील उद्देश तक्रारदाराला त्याची रक्कम मिळावी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
'गहाळ पत्त्या'चा उल्लेख
सुनावणीदरम्यान राजपाल यांनी स्वत:च्या ‘अता पता लापता’ या चित्रपटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा उल्लेख केला. या चित्रपटामुळे 20 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेण सरन्यायाधीशांनी चित्रपटाच्या नावाचा संदर्भ घेत हलक्या-फुलक्या शैलीत ‘तुमच्या चित्रपटाप्रमाणे तुमचे पैसेही अता पता लापता आहेत’ अशी टिप्पणी केली.
5 कोटींच्या देणीचा वाद
राजपाल यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण वाद 5 कोटी रुपयांच्या देणीशी संबंधित आहे. या प्रकरणाचा संबंध ‘अता पता लापता“ चित्रपटाशी आहे. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने चित्रपटासाठी राजपाल यांना रक्कम पुरविली होती. तर परतफेडीसाठी राजपाल यांनी दिलेले 1.05 कोटीचे सात धनादेश वटले नव्हते.
Comments are closed.