मुंबईच्या धरणांतील गाळ कधी काढणार? अभ्यासपूर्ण प्रस्ताव आणण्याची नगरसेवकांची मागणी
माती, पालापाचोळा, कचरा वाहून येतो. परिणामी धरणांतील पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धरण क्षेत्रांतील गाळ किमान पाच ते दहा वर्षांतून एकदा काढावा, असा प्रस्ताव आज पालिकेच्या स्थायी समितीसमोर आणला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरण क्षेत्रांतील, तलावांतील गाळ काढण्यावर जोर देत यासंदर्भात अभ्यासपूर्ण प्रस्ताव आणावा, अशी मागणी केली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव परत पाठवला.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया धरणातील गाळ काढल्यास जलाशयांची साठवण क्षमता 10 टक्के तरी असे शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे म्हणाले, नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करताना जलशुद्धीकरणाचे प्रकल्प अन्य ठिकाणी सुरू करण्यावर भर देण्याची मागणी केली. एमआयएमचे जमीर पुरेशी यांनी दरवर्षी नालेसफाईदरम्यान टेंडर दिल्यामुळे गाळ काढण्यात घोटाळा होतो तसाच घोटाळा या प्रकल्पातदेखील होऊ शकतो. यामुळे मुंबई महानगरपालिकेने स्वतःची सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली.
Comments are closed.