ओबेरॉय, ट्रायडेंटच्या कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ; कर्मचाऱ्यांनी मानले भारतीय कामगार सेनेचे आभार

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे हॉटेल ओबेरॉय व हॉटेल ट्रायडेंट, नरिमन पॉइंटमधील कामगारांच्या पगारामध्ये 24,100 रुपयांची वाढ करण्याचा ऐतिहासिक करार केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाने दोन्ही हॉटेलमधील कामगारांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक करार संपन्न झाला. यावेळी हॉटेल ओबेरॉयच्या व्यवस्थापनाकडून धीरज मेहता, हॉटेल ट्रायडेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक अमित कौल, हॉटेल ओबेरॉयचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक गौरव कुमार, हॉटेल ट्रायडेंटचे उपाध्यक्ष आणि एचआर हेड डेव्हिड नायडू, अनुज अगरवाल तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस गिरीश सावंत, युनिट अध्यक्ष कुणाल ढापरे, सरचिटणीस सतीश हरवणकर, खजिनदार रूपेश धोंगडे, संजय गायकर, प्रशांत पाटील, महेश कंटोललू, शैलेंद्र खामकर, सुनील आम्रे, परशुराम कांबळे, राजेंद्र सकपाळ, राजेश गोळे, शिवकुमार गणेशन, रामदास सूर्यवंशी, मीनाक्षी वेंगुर्लेकर, मनप्रीत शिकार, डॅनी कारवालो, मनोज पवार, अभिजित भावसार, रामचंद्र ठाकूर, सदानंद पागडे उपस्थित होते.

२५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना 24,100 तर ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना ४६०० पगारवाढ देण्यात आली. डीए ६.५ करण्यात आला. गणेशोत्सव बक्षीस म्हणून 20,900 रुपये देण्यात येईल. निवृत्त कामगाराला ग्रॅच्युइटीव्यतिरिक्त अडीच लाख देण्यात येणार आहेत. करारनाम्यादरम्यान निवृत्त होणाऱया कामगारांनासुद्धा या करारनाम्याचा पूर्ण लाभ देण्यात आला. मासिक सहा साप्ताहिक सुट्टय़ा करण्यात आल्या असून कामगार कार्यरत असताना मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबीयांना वीस लाखांची एकरकमी विनापरतावा आर्थिक मदत करण्यात येईल. हा करारनामा चार वर्षांकरिता आहे.

Comments are closed.