Live – आदित्य ठाकरे, अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाण मांडून, आंदोलनकर्त्यांची तुफान गर्दी
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी शिवसेनाभवना बाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना देखील ताब्यात घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले होते. दुसऱ्या बाजूला मनसे नेते अमित ठाकरे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडून होते.
- जोपर्यंत सर्व आंदोलकांना सोडत नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार. अजुनही हे आंदोलन शांत आहे. पण जर आंदोलकांना हात लावला तर हे आंदोलन चिघळेल आणि त्याचे खापर फडणवीसांच्या डोक्यावर फुटेल.
- आदित्य ठाकरे, अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाण मांडून, आंदोलनकर्त्यांची तुफान गर्दीॉ
- आदित्य ठाकरे आक्रमक, पोलिसांच्या व्हॅनवर चढले.
- पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले
- रस्त्यावर गोंगाट आहे… मोदी-शहा मत चोर आहेत… आंदोलक करत आहेत जोरदार घोषणा
- आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांचा शिवसेना भवनाबाहेर ठिय्या
Comments are closed.