सोमेश्वर साखर कारखान्यासाठी 80 टक्के मतदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सुमारे 84 टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर महाविद्यालयातील मतदान केंद्रावर ‘ब’ वर्गातून मतदानाचा हक्क बजावला. पुरुषोत्तम जगताप यांनी वाणेवाडी येथे मतदान केले. 83 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी मतमोजणी होणार आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या 21 संचालकांसाठी रविवारी सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दिवसभर अनेक मतदान केंद्रांवर सभासदांची गर्दी पाहायला मिळाली. काही केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Comments are closed.