सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची जो रूटला पूर्ण मुभा! ECB कडून मोठी घोषणा
खेळांमधील विक्रमे हे मोडण्यासाठी बनलेले असतात, मात्र काही असे असतात जे मोडणे जवळपास अशक्यच असतात. इंग्लंडचा फलंदाज जो रूटला मात्र तशी संधी मिळाली आहे. त्याला ‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे.
सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहे. हा बलाढ्य विक्रम आपल्या नावावर करून घेण्यापासून रूट फार दूर नाही. आता त्याला तशी मोकळीकही मिळाली आहे.
बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा रूटने इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली. त्याने २०१७-२०२२ मध्ये इंग्लंडचे कसोटी नेतृत्वपद सांभाळले आहे. आता तो पुन्हा या पदावर आला असून नुकतेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याच्या केंद्रिय कराराबाबत मोठी घोषणा केली आहे.
क्रिकेट बोर्ड साधारणपणे खेळाडूंसोबत एका वर्षाचे करार करतात, मात्र ECB ने रूटसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. जर रूटने त्याच्या कामगिरीत सातत्य राखले, तर तो सप्टेंबर २०२८ पर्यंत सहज इंग्लंडसाठी खेळू शकतो.
या दोन वर्षांच्या कालावधीत रूटला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत, तर रूटने १६९ कसोटी सामन्यांमध्ये १४,२७८ धावा केल्या आहेत. याचा अर्थ रूट सचिनचा विक्रम मोडण्यापासून केवळ १६४३ धावांनी मागे आहे.
पुढील दोन वर्षांत रूट कसोटी क्रिकेट खेळत राहिला, तर तो सहजच सचिनचा विक्रम मोडेल. त्याची कामगिरी पाहिली, तर त्याने २०२१ पासून एका कॅलेंडर वर्षात तीनदा १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच यामध्ये दोनदा त्याने १५०० पेक्षा अधिक धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्याने अशीच कामगिरी येत्या दोन वर्षांत केली तर सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला सोपे जाईल.
इंग्लंडले २०२६/२७ साठी ३० खेळाडूंसोबत केंद्रीय करार केले आहेत. यामधील एकूण ११ खेळाडू दोन वर्षांच्या करारावर आहेत.
रूटसोबत ECB ने दोन वर्षांचा करार केल्याने त्याच्यावरील सचिनचा विक्रम घाईघाईने मोडण्याचा दबाव काहीसा कमी झाला आहे. (Joe Root now can easily break Sachin Tendulkar’s Most Test Runs world record! Major announcement from ECB)
Comments are closed.