रात्रीचा शिळा भात पुन्हा गरम करून खाताय?
स्वयंपाक करताना अनेकदा भात उरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी हा शिळा भात पुन्हा गरम करून खाण्याची सवय अनेकांना असते. अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी ही पद्धत योग्य वाटत असली, तरी आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, शिळा भात पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो.
यामागे एक प्रमुख वैज्ञानिक कारण आहे. कच्च्या किंवा शिजवलेल्या तांदळामध्ये बॅसिलस सेरेस नावाचे घातक जिवाणू असतात. जेव्हा भात शिजवून बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवला जातो, तेव्हा हे जिवाणू वेगाने वाढू लागतात. भात पुन्हा गरम केला तरी या जिवाणूंद्वारे तयार होणारे विषारी घटकनष्ट होत नाहीत. परिणामी, असा भात खाल्ल्यास पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि जुलाब यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
महत्त्वाच्या गोष्टी
- शिजवलेला भात जास्त वेळ बाहेर किंवा साध्या फ्रिजमध्ये उघडा ठेवू नये.
- भात उरल्यास तो तातडीने हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा आणि 24 तासांच्या आत संपवावा.
- शिळा भात वारंवार गरम करणे आरोग्यासाठी पूर्णपणे टाळावे.
आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, तर शिळे अन्न खाणे टाळणे केव्हाही उत्तम ठरते. ताजे आणि पौष्टिक अन्न खाण्याला प्राधान्य द्यावे.
हेही वाचा – मोबाईल स्क्रीन वारंवार खराब दिसते? स्वच्छ करताना या चुका टाळा
Comments are closed.