ऑस्ट्रेलियाचा 214 धावांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जोश हेझलवूडच्या वेगवान माऱयाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत यजमानांना 214 धावांनी चारीमुंडय़ा चीत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत कांगारूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतही आपली पकड अधिक मजबूत केली.

दुसऱया डावात ऑस्ट्रेलियाने 6 बाद 314 धावांवर डाव घोषित करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 421 धावांचे प्रचंड आव्हान ठेवले. चौथ्या दिवसअखेर 4 बाद 102 धावा अशी स्थिती असताना एडन मार्करमने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची 75 धावांची झुंजही अपुरी ठरली. डेव्हिड बेडिंगहॅमने 46 धावा करत साथ दिली, पण उर्वरित फलंदाजांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. पाचव्या दिवशी हेझलवूडने 49 धावांत सहा विकेट टिपत आफ्रिकेचा डाव 206 धावांत गुंडाळला.

Comments are closed.