‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारांवर हिंदुस्थानी खेळाडूंचे वर्चस्व

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ची घोषणा केली असून हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. पुरुष गटात हिंदुस्थानचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून गौरविण्यात आले. महिला गटात सलामीवीर शेफाली वर्माने हा पुरस्कार पटकावला.

या पुरस्काराच्या शर्यतीत शुभमन गिलसोबत हिंदुस्थानचा अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांचाही समावेश होता.महिलांच्या गटात शेफाली वर्माने श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू आणि हिंदुस्थानच्या श्री चरणी यांना मागे टाकले. शेफालीने सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 360 धावा केल्या. तिने गोलंदाजी करताना सहा विकेट्सही घेतल्या.

Comments are closed.