वसई-विरार महापौर मॅरेथॉन 13 डिसेंबरला
राष्ट्रीय वसई-विरार महापौर मॅरेथॉनचा बिगुल वाजला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 13 डिसेंबरला ही स्पर्धा रंगणार असून ऑनलाइन नोंदणी 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने हिंदुस्थानातील धावपटूंवर या मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानातील 58 लाखांच्या पुरस्काराचा वर्षाव केला जाणार असल्याची माहिती महापौर आजीव पाटील यांनी दिली.
पूर्ण मॅरेथॉन 42 किमी, अर्ध मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा वेळेची नोंद होणाऱया शर्यतींसह तीन किमीची ‘धमाल धाव’ही होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये सेनादल, रेल्वे, एनआयए तसेच देशभरातील आघाडीचे धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 10 ते 18 वर्षांच्या शालेय खेळाडूंसाठी विविध शर्यती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8879559049, 8291262892 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.