मुंबईचा बोनस गुणासह दणदणीत विजय, चंदिगडचा एक डाव आणि 155 धावांनी पराभव
रणजी स्पर्धेची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मुंबईच्या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात आपले इरादे स्पष्ट केले. सामन्याच्या तिसऱयाच दिवशीच मुंबईने चंदिगडवर दणदणीत विजय साकारत बोनस गुणही आपल्या नावावर केला. मुंबईने मंगळवारी रणजी ट्रॉफी एलिट गट ‘डी’ च्या सामन्यात चंदिगडचा एक डाव आणि 155 धावांनी पराभव करून मुंबईने विजयाची शानदार बोहनी केली.
मुंबईने चंदिगडला दिला होईल अनुसरण करा
सोमवारी मुंबईने चंदिगडला त्यांच्या पहिल्या डावात केवळ 78 धावांवर गुंडाळून 351 धावांची दमदार आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्णधार सिद्धेश लाडने मुंबईचा आक्रमकपणा आणि चंदिगडवर फॉलोऑन लादला. दुसऱया दिवसाचा खेळ संपेपर्यंत चंदिगडची एक विकेट पडली होती. मंगळवारी मुंबईच्या गोलंदाजांनी पाहुण्या संघाला 52.1 षटकांत 196 धावांवर गुंडाळले. शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या युवा गोलंदाजांनी आपल्या तालावर चंदिगडला चांगलेच नाचवले. पहिल्या डावात तुषार देशपांडेने पाच विकेट्स मिळवल्यामुळे या दोघांनाही एकही चेंडू टाकावा लागला नव्हता. पण दुसरा डाव मात्र या दोघांनीच गाजवला. शम्सने 69 धावांत तीन फलंदाजांना बाद केले, तर तनुषने 30 धावांत तीन विकेट्स घेतले.
तत्पूर्वी, मुंबईने आपल्या पहिल्या डावात 429 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार सिद्धेश लाडने 86 धावांची दमदार खेळी साकारली होती. सिद्धेशला मुशीर खान (65), तनुष (58) आणि मोहित अवस्थीने नाबाद 56 धावा करत चांगली साथ दिली होती. त्यामुळेच मुंबईच्या विजयाचा पाया फलंदाजांनीच
रचला होता.
लहान धावफलक
मुंबई – 136 .5 षटकांत सर्व बाद 429 (सिद्धेश लाड 86, मुशीर खान 65; राज बावा 4/73) विजयी वि. चंदिगड – पहिला डाव ः 19.1 षटकांत सर्व बाद 78 (निशुंक बिर्ला 33; तुषार देशपांडे 5/17, मोहित अवस्थी 3/9). दुसरा डाव – 52.1 षटकांत सर्व बाद 196 (अर्जुन आझाद 62; तनुष कोटियन 3/30, शम्स मुलानी 3/69).
उपकर्णधार आयुष म्हात्रे दुखापतीमुळे तीन सामन्यांमधून बाहेर
मुंबई क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित उपकर्णधार आयुष म्हात्रेला रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. म्हात्रेची जुनी उजव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत पुन्हा बळावली असून त्यामुळे तो रणजी ट्रॉफीच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही आणि हा मुंबईसाठी एक मोठा धक्का आहे.
यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आयपीएलच्या दुसऱया टप्प्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो जवळपास पाच महिने क्रिकेटपासून दूर राहिला होता. या दुखापतीमुळे त्याला जूनमध्ये मुंबईची स्थानिक टी-20 स्पर्धा, ऑगस्टमध्ये इंडिया ‘अ’ संघाचा श्रीलंका दौरा आणि दुलीप ट्रॉफी यांसारख्या मोठय़ा स्पर्धांमध्ये खेळता आले नव्हते.
वानखेडे स्टेडियमवर चंदिगडविरुद्ध मुंबईच्या पहिल्या डावात 48 धावा केल्यानंतर 19 वर्षीय आयुष म्हात्रेच्या घोटय़ाला पुन्हा दुखापत झाली. ऑक्टोबर रोजी त्याची स्कॅन चाचणी करण्यात आली, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. आयुष आता तीन सामने खेळणार नाही. त्याच्या जागी 22 वर्षीय कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर अंगक्रिष रघुवंशीची निवड करण्यात आली आहे.
Comments are closed.