‘मरे’ला ‘बंचिंग’चा फटका.. लोकलच्या एकामागोमाग रांगा, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रवासी संतापले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘बंचिंग’चा फटका आज कसारावासीयांना बसला. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी ‘मरे’ चे वेळापत्रक कोलमडले. लोकल एक ते दीड तास उशिराने धावू लागल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रवासी चांगलेच संतापले.

कसारा स्थानकातील बंचिंगमुळे लांबपल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस गाड्या आणि कसारा-कल्याण लोकल गाड्या एकामागोमाग उभ्या करण्यात आल्या होत्या. अचानक रेल्वे सेवा ठप्प झाल्याने सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी 6.57 मिनिटांनंतर कसाराहून मुंबईसाठी एकही लोकल ट्रेन तब्बल तासाहून अधिक काळ सुटली नाही. दरम्यान मुंबईहून कसाराकडे येणारी सकाळी 7 वाजताची लोकल दीड तास उशिराने आली आणि 7.45 वाजता येणारी लोकल एक तास उशिरा आल्याने प्रवाशांचे कंबरडे मोडले.

अनेक प्रवाशांची कामावर दांडी

सकाळी मुंबईहून येणाऱ्या लोकल खर्डी स्थानकापासून काही अंतरावर थांबवून ठेवण्यात आल्या. मालगाडी, मेल एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ केल्याने खर्डी ते कसारा हा 20 मिनिटांचा प्रवास दीड तासावर गेला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना कामावर दांडी मारावी ल दीडागली तर कसारा, उंबरमाळी, खर्डी, तानशेत, आटगावहून कल्याण, ठाणे, मुंबईकडे कामाला जाणाऱ्या काहींना लेटमार्क लागला.

Comments are closed.