चाणक्य निती- या सवयींमुळे यश मिळवण्यात येतात अडथळे





आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान राजकीय विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, कूटनीतिज्ञ आणि रणनीतिकार होते। त्यांना कौटिल्य आणि विष्णूगुप्त या नावांनीही ओळखले जाते. त्यांची चाणक्यनिती आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग, व्यावहारिक आणि नैतिक विचार करण्यासाठी प्रेरित करते. यामुळे
सामान्य व्यक्तीलाही चाणक्यांची जगण्याची निती जीवनात वापरता येते.

जसे की काहींना कमी काम करून देखील भरघोस यश मिळते. तर काहीजणांना मात्र दिवसरात्र कष्ट करूनही य़श मिळवता येत नाही. त्यासाठी खरं तर दुसऱ्यांना दोषी ठरवण्यापेक्षा स्वत:मध्ये काही बदल करणे गरजेचे असते असे चाणक्य निती सांगते. कारण आपल्याच काही अशा सवयी असतात ज्या यशात अडथळा ठरू शकतात. कोणत्या आहेत या सवयी ते बघूया.

आळस
चाणक्य म्हणतात.आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर हा आळस झटकावा लागतो. ज्या व्यक्ती आळशी असतात त्यापासून य़श लांबच राहते. अशा व्यक्तींना सगळे तयार जागच्या जागी हवे असते . अशा व्यक्ती कष्ट करणे टाळतात.

नशीब
काहीजण आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी नेहमी नशीबाला जबाबदार ठरवतात. चाणक्य म्हणतात प्रत्येकवेळी नशीबावर अवलंबून राहणे योग्य नाही. प्रत्येकाला कर्माची चिंता असणे आवश्यक आहे. कर्माशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे स्वताहून काम करायला हवीत. योग्य वेळेची वाट पाहू नये.

लक्ष्य

चाणक्यनितीनुसार जर तुमचं लक्ष्य नसेल आणि वागण्यात शिस्त नसेल तर अपयश निश्चित असते. जर ायुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लक्ष्य असणे गरजेचे आहे.

अज्ञानी
चाणक्य म्हणतात “अनभ्यासे विषं शास्त्रम्” म्हणजे निरंतर अभ्यास व विद्या विना मिळवलेले ज्ञान हे विषासमान असते. त्यामुळे अर्धवट ज्ञान घेऊ नये. सातत्याने शिकत राहावे. ज्ञान ग्रहण करत राहावे.



Comments are closed.