निसर्गानं होरपळलं आणि राजाने भाजून काढलं; झळ मात्र सरकारपर्यंत पोहचेना! रोहित पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळ शेतकरी पुरता कोलमडला आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. निसर्गानं होरपळलं आणि राजाने भाजून काढलं, असंच शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. याची झळ मात्र सरकारपर्यंत पोचत नाही, हे दुर्दैव.! असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला.

रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले की, महाराष्ट्र तर दुष्काळात होरपळतोय, पण काही जिल्ह्यात जिथं कुठं थोडा-फार पाऊस पडला तिथल्या शेतकऱ्यांना खतांच्या आकाशाला भिडलेल्या किंमती पाहूनच भोवळ येईल, अशी परिस्थिती आहे. खतांच्या किंमतीत गोणीमागे तब्बल 250 ते 600 रुपये इतकी मोठी वाढ झालीय. त्यामुळं निसर्गानं होरपळलं आणि राजाने भाजून काढलं, असंच शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. याची झळ मात्र सरकारपर्यंत पोचत नाही, हे दुर्दैवी असल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Comments are closed.