मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसैनिकांनी घुगेंच्या विजयासाठी कंबर कसावी- अंबादास दानवे

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या विजयासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे, विजय आपलाच होईल, असा विश्वास शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी आज येथे केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उभे असलेले उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ आज हॉटेल मिंन्ट येथे पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला खूप कमी वेळ असून, पक्षप्रमुखांचा आदेश असल्याने आपापल्या तालुक्याची जबाबदारी स्वतः खांद्यावर घेवून सकारात्मक दृष्टीने मतदारांकडे जावून आपला उमेदवार विजयी करायचा आहे. सरकारच्या विरोधात जनमत निर्माण होत आहे, शेतकर्‍यांना मिळालेली मदत कवडीमोलाची आहे, यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. पदवीधरांचे प्रश्न गेल्या १८ वर्षात सुटले नाहीत, विद्यमान आमदारांनी नेमके काय केले, हा संशोधनाचा विषस असल्याचे त्यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टीने आपण प्रचार करुन प्रामाणिक व हाडाचा कार्यकर्ता असलेल्या शिवसेना उमेदवार दिलीप घुगे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एकूण मतदार व तालुकानिहाय मतदार यांची सविस्तर माहिती घेतली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बालाजी पेनूरकर यांनी केले.

यावेळी नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, रवींद्र भिलवंडे नायगाव, मनोज यादव महानगरप्रमुख दक्षिण, सुनिल पाटील कदम तालुकाप्रमुख नांदेड उत्तर, पद्माकर सावंत, तालुकाप्रमुख, पिंटू पाटील वासरीकर तालुकाप्रमुख मुदखेड, डॉ. बालाजी पेनूरकर प्रवक्ता, विजय कल्याणकर विधानसभा प्रमुख, नांदेड उत्तर, विश्वभर पवार, अविनाश झमकडे मुदखेड, युवासेनेचे युवा अधिकारी अ‍ॅड. अक्षय वट्टमवार, अर्जुन ठाकूर शहरप्रमुख नांदेड दक्षिण, जितुसिंग टाक शहरप्रमुख सिडको नांदेड, बालाजी कल्याणकर, बंडू देशमुख तरोडेकर, यश खराटे, सचिन पाटील, माधवराव पांचाळ, नागनाथ महादापुरे शहर प्रवक्ता, माधवराव कल्याणकर, श्रीपाद रायवार, पिंटू सुनपे, मनोज काकडे, बाबासाहेब जोगदंड, पुरभाजी जाधव, वसंत पाटील, गणेश भोसले, गजानन हरकरे, दिलीप भगिले, नितीन सरोदे, अशोक पुयड, स. नवज्योतसिंग गाडीवाले, निवृत्ती जिंकलवाड आदी उपस्थित होते.

Comments are closed.