ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त योगासने





भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या आजाराचे निदान जितके लवकर होईल, तितके त्यावर वेळेत उपचार करणे सोपे जाते. एका संशोधनानुसार, नियमित योगाभ्यास केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यास मोठी मदत होते. ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी कोणती योगासने फायदेशीर ठरू शकतात जाणून घेऊया.

तिर्यका भुजंगासन

तिर्यक भुजंगासनाचा सराव केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. हे आसन करण्यासाठी तुम्हाला योगा मॅटवर तळहाताचा आधार घेऊन झोपावे लागेल. यानंतर पायांमध्ये 2 फुटांचे अंतर ठेवावे. यानंतर पायांमध्ये डोके उचला आणि इनहेल करा.

शलभासन

शलभासन योगासनाच्या सरावाने ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून रोखता येते. शलभासन करण्यासाठी खांद्याच्या खाली तळहातांनी पोटावर झोपावे. यानंतर पाय एकत्र ठेवा आणि बोटे बाहेरच्या बाजूला ठेवावीत. श्वास घ्या आणि उजवा हात वर करा आणि डावा पाय मागे घ्यावा. आपले डोके व छाती वर उचलताना श्वास सोडत शरीर खाली आणा. दुसऱ्या बाजुनेही अशीच कृती करावी.

सर्पासन

सर्पासन सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरसाठी प्रभावी मानले जाते. यासाठी तुम्हाला पोटावर झोपावे लागेल. श्वास घेत शरीर वरच्या बाजूस उचला आणि हात पाठीमागे ठेवा. फक्त आपले पाय जमिनीपासून वर उचलू नका.

नौकासन

नौकासन करण्यासाठी पाठीवर झोपून घ्यावे. यासाठी दोन्ही हात मांडीच्या पुढे असले पाहीजेत आणि शरीर सरळ रेषेत असावे. यानंतर शरीर सैल सोडा आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करा. श्वास घेताना डोके, पाय आणि शरीर 30 अंशावर पर्यत उचला. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा हीच कृती 2 ते 3 वेळा करावी.

हेही वाचा – शहाळ्याच्या पाण्याचे आरोग्यासाठी होतात हे फायदे



Comments are closed.