स्वप्न सत्यात उतरणार… आता कारही हवेत उडणार! टेस्लाने शेअर केला ‘रोडस्टर’चा थरारक व्हिडीओ; एका सेकंदात 100 किमी वेगाने जग थक्क

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्पनेला वास्तवात उतरवत अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीने हवेत उडणारी कार बनवून दाखवली आहे. टेस्लाने आपल्या एक्स अकाऊंटवरून ‘टेस्ला रोडस्टर’ या कारचा हवेत झेपावतानाचा आणि सुरक्षित लँडिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रॉकेटच्या उड्डाणासाठी वापरले जाणारे ‘कोल्ड गॅस थ्रस्टर्स’ या कारमध्ये बसवण्यात आले आहे. ही कार 1 सेकंदामध्ये 0 ते 96 किमी प्रति तास एवढा प्रचंड वेग पकडू शकते असा दावाही करण्यात आला आहे. टेस्लाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून जग थक्क झाले असून आता कार चालवण्याचे नाही तर उडवण्याचे दिवस आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Comments are closed.