Ratnagiri News – खाऊच्या पैशांतून 30 हजारांची मदत; खेर्डी-चिंचघरीच्या विद्यार्थ्यांचा माणुसकीचा आदर्श
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि गरजू व्यक्तींप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने आपल्या खाऊच्या पैशांतून बचत करून या मदतकार्यात योगदान दिले. त्यांच्या या कृतीतून दातृत्वाची भावना आणि माणुसकीचे दर्शन घडले.
जिद्द मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांच्याकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सकपाळ सर आणि शिक्षकवृंदाने 30 हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. या मदतीमुळे विशेष गरजा असलेल्या मुलांना आधार मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये परोपकार, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
उपक्रमासाठी पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्यासह शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शीतल पाटील आणि स्वरा भुरण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Comments are closed.