न्यू इंग्लिश स्कूल ज्ञानदीपची दणदणीत कामगिरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत जनरल एज्युकेशन अकादमीने पराग इंग्लिश स्कूलचा डावाने आणि सात धावांनी धुव्वा उडविला. शमसुद्दीन मन्सेबदारने 42 धावांत सात विकेट्स घेत परागचा पहिला डाव 67 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात शार्दुल फागरेच्या नाबाद 113 धावांच्या शतकी खेळीने जनरल एज्युकेशनला 242 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसऱया डावात स्वरज मोरे (43 धावांत 5 विकेट) आणि स्पर्श घोलप (14 धावांत 3) यांनी परागचा डाव 168 धावांत संपवला.

ज्ञानदीप सेवा मंडळाने पार्ले टिळक इंग्लिश स्कूलवर डावाने आणि 95 धावांनी मात केली. गोलू पालने दोन्ही डावांत मिळून 11 विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. वांद्रय़ाच्या न्यू इंग्लिश स्कूलने अल बरकत एमएमआयचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. निखिल गुरवने सामन्यात 11 विकेट्स घेत विजयाचा पाया रचला. गोरेगावाच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलने चेंबूर कर्नाटकवर आठ विकेट्सनी मात केली.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने आद्वित तिवारीच्या 105 धावांच्या शतकाच्या जोरावर अंजुमन अल्लानीविरुद्ध सामना अनिर्णित राखला. अद्वितने गोलंदाजीतही पाच विकेट्स घेत अष्टपैलू चमक दाखवली. आधुनिक इंग्लिश स्कूल आणि रिझवी प्रिंगफिल्ड यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला.

Comments are closed.