पुर्णेकर हत्येप्रकरणी राजेंद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा चौकशी, सोमवारी पुन्हा बोलावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची आज तिसऱयांदा चौकशी करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात सुमारे पावणेसात तास चाललेल्या या चौकशीत अटकेतील आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित सिंग ऊर्फ पपलू यांच्यासोबत त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. सोमवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

राजेंद्र शिंदे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात आले. सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील तपासाच्या दृष्टीने पुढील चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

नेक्स्ट गेम तुझा… पुर्णेकरांच्या पुतणीला धमकी

प्रदीप पुर्णेकर यांची पुतणी खुशबू हिला धमकी आली आहे. ‘अगला गेम तेरा..’, ‘नेक्स्ट गेम तुझा…’ असा संदेश इन्स्टाग्रामवरून आल्याचे खुशबू हिने सांगितले. त्यामुळे पुर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करा अशी मागणी खुशबू हिने लावून धरली होती.

Comments are closed.