कुपवाडा येथे दोन दहशतवादी ठार

नियंत्रण रेषेजवळ पहाटे 3:30 वाजता चकमक : केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांकडून शोधमोहीम

न्यूज एजन्सी/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात शनिवारी पहाटे नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या संघर्षात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहेत. कुपवाडा येथील केरन सेक्टरमधील जुमागंड परिसरात शनिवारी पहाटे 3:30 च्या सुमारास सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाल दिसून आली. जवानांनी संबंधितांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सुरक्षा जवानांच्या गोळीबारात दोन संशयितांना प्राणास मुकावे लागले. या चकमकीनंतर केरन सेक्टरमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. सुरुवातीला या घटनेचा संबंध घुसखोरीच्या प्रयत्नाशी जोडला जात होता, परंतु दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Comments are closed.