. ज्याचा निर्धार पक्का आहे.

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> संध्या शहापुरे

चित्तशुद्धीसाठी एकांतासारखे दुसरे साधन नाही. संत तुकाराम साधक अवस्थेत असताना देवाची विनवणी करतात. ‘एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवूनि’ -हे देवा पांडुरंगा, संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणारे आघात चुकवून आता एकांताचे सुख माझ्या पदरात घाल. तुकाराम बुवा एकांतासाठी भामनाथाच्या, भंडाऱयाच्या डोंगरावर जाऊन भजन, ज्ञानेश्वरी वाचन, नाथभागवत, गीता यांचे वाचन करू लागले. इथेच त्यांना कवित्वाची प्रेरणा मिळाली. स्वतला आलेले पारंपरिक अनुभव त्यांनी अभंगांतून मांडले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वाटू लागली.’ अरण्यसेवनात एकांत हा एक भाग. दुसरे म्हणजे, तारुण्यातच सर्व प्रापंचिक सुखोपभोगांपासून अलिप्त, गुंतून न पडता राहण्याचा. तिथले कष्ट सोसतच संसारात राहण्याचा दृढनिश्चय करणे. तुकारामांचा हा दुसरा अभंग पहा, ‘जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे। वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला। आठवण नाही सुखदुःखा, नाचे तुका कौतुके।’ यात संत तुकारामांनी अरण्यसेवनाचा दुसरा अर्थ स्पष्ट केला आहे. ज्याप्रमाणे विठ्ठलाचे नाम सर्वत्र असूनही जसे कुठेच दिसत नाही, त्याप्रमाणे या प्रपंचात लोक असूनही नसल्यासारखे दिसत आहेत. एवढेच नव्हे तर, आता शहर आणि वन यांच्यामधील फरकदेखील जाणवेनासा झाला आहे.

Comments are closed.