3 हजार 300 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारला, आयर्लंडमध्ये अर्जासाठी एआयची मदत घेणे भोवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयर्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना जबर फटका बसला आहे. विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्ज तयार करण्यासाठी थेट एआयची मदत घेतल्याने त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. 5 हजार 100 विद्यार्थ्यांपैकी 3300 विद्यार्थ्यांचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. व्हिसा नाकारण्याचे प्रमाण 64 टक्के इतके आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना आयर्लंडमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्जाचा भाग म्हणून यर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे उद्देशाचे निवेदन सादर केले, तेव्हा हे अर्ज एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थ्यांची उत्तरे ही एकसारखीच होती, असे व्हिसा अधिकाऱयांच्या लक्षात आले. अर्जदारांना आयर्लंडमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा का आहे, हे स्पष्टपणे सांगता आले नाही. अनेक अर्जांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतण्याच्या योजनांबाबतही स्पष्टता नव्हती. आयर्लंडमध्ये शिक्षण घेतल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर शेजारील ब्रिटनमध्ये नोकरीच्या संधीही मिळतात.

अमेरिकेतील प्रवेश बंदीमुळे स्थलांतर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱयांदा सत्तेत आल्यानंतर लागू केलेल्या कठोर धोरणांमुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रवेश मिळवणे  कठीण झाले आहे. ब्रिटनमध्येही कठोर धोरण अवलंबिल्याने हिंदुस्थानातील विद्यार्थी हे अमेरिकेला न जाता ते आता आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशांत जात आहेत.

Comments are closed.