बाजीप्रभू चौक बस थांब्याने घेतला मोकळा श्वास; डोंबिवलीत अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले हटवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस थांब्याला अनधिकृत फेरीवाले, टपरीधारक आणि दुचाकी पार्किंगचा विळखा पडला होता. बस थांब्याच्या परिसरात टपऱ्या थाटल्या होत्या. तसेच फुलविक्रेत्यांनी ठाण मांडले होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतचे वृत्त दैनिक पालिका प्रशासन जागे झाले. बस थांब्याला खेटून असलेल्या टपऱ्या हटवण्यात आल्या. तसेच बस थांबा परिसर नो हॉकर्स झोन असल्याने फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या कारवाईमुळे बस थांब्याने मोकळा श्वास घेतला.

‘सामना’तून प्रसिद्ध होताच कल्याण-डोंबिवली

बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस थांब्यातील आसन व्यवस्थेखाली अनेक फुलविक्रेत्यांनी आपले साहित्य ठेवले आहे. याच ठिकाणी बसून हार, गजरे आणि बुके तयार केले जातात. त्यानंतर बस थांब्याच्या समोरील भागात त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या वापरासाठी असलेल्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत होता. बस थांब्याच्या परिसरात अनधिकृत टपऱ्या असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख राजू नलावडे यांनी पालिकेचे अनधिकृत अतिक्रमणविरोधी पथक दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन केडीएमसीने फेरीवाल्यांवर कारवाई केली.

Comments are closed.