कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा ,मराठवाडय़ातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱयासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडय़ातील धाराशीव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या चार जिह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर दुसरीकडे मराठवाडय़ात हवामान बदलांमुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. धाराशीव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तसेच पुणे, सातारा, रायगड, बीड, परभणी या जिह्यांतील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Comments are closed.