Posthumous Marriage: असं गाव जिथे मृतांशी केलं जातं लग्न




असं गाव जिथे मृतांशी केलं जातं लग्न


लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र आयुष्य जगण्याची घेतलेली शपथ. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्याशी लग्न करण्याची कायदेशीर तरतूद असू शकते, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फ्रान्समध्ये ‘पोस्टह्युमस मॅरेज’ (Posthumous Marriage) म्हणजेच मृत्यूनंतर विवाह करण्याची विशेष कायदेशीर तरतूद आहे. विशेष म्हणजे, यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची परवानगी आवश्यक असते.

काय आहे ही अनोखी प्रथा?
फ्रान्समध्ये हा विवाह एखाद्या विशिष्ट गावापुरता मर्यादित नसून देशाच्या कायद्यातील एक अपवादात्मक तरतूद आहे. फ्रेंच नागरी कायद्यातील कलम 171 नुसार, भावी पती किंवा पत्नी यांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास गंभीर कारणांच्या आधारे राष्ट्राध्यक्ष विवाहाला परवानगी देऊ शकतात. मात्र, मृत व्यक्तीची लग्न करण्याची इच्छा स्पष्टपणे सिद्ध करणारे पुरावे असणे आवश्यक आहे. केवळ मृत व्यक्तीवर प्रेम होतं, या कारणावरून हा विवाह करता येत नाही. संबंधित व्यक्तीची विवाह करण्याची संमती स्पष्ट असावी आणि प्रकरणात गंभीर कारणं असणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतरच विवाहाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

लग्नानंतर कायदेशीर हक्क
या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत असली, तरी त्यातून जिवंत जोडीदाराला सामान्य वारसाहक्क आपोआप मिळत नाही. तसेच, दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वैवाहिक मालमत्ता व्यवस्था अस्तित्वात होती, असंही मानलं जात नाही.

महत्त्वाचं म्हणजे, ही फ्रान्समधील एखाद्या गावाची परंपरा नसून देशभर लागू असलेली विशेष कायदेशीर तरतूद आहे. प्रेम, बांधिलकी आणि अपूर्ण राहिलेल्या नात्याशी संबंधित या कायद्यामागे काही अपवादात्मक परिस्थितींना कायदेशीर मान्यता देण्याचा उद्देश आहे.



Comments are closed.