‘जियो’च्या आयपीओसाठी अँकर बुक 30 पटींपेक्षा जास्त सबस्क्राईब
जियो प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या आयपीओला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ आज अँकर इन्व्हेस्टर्स अर्थात मोठय़ा संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी अँकर बुक 30 पटींपेक्षा जास्त सबस्क्राईब झाला आहे. जियोच्या आयपीओमध्ये 8,110 कोटी रुपयांचे शेअर्स अँकर गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल 2.5 लाख कोटी रुपयांची बोली गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी लावली आहे. कोणत्याही हिंदुस्थानी आयपीओसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी अँकर बुक बोली आहे.
जियोच्या आयपीओमध्ये 200 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बोली लावली आहे. त्यात एलआयसी, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, एसबीआय पेन्शन, एचडीएफसी पेन्शन, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यासारख्या देशातील मोठय़ा विमा पंपन्या आणि पेन्शन फंड्सचा समावेश आहे. याशिवाय ड्रगनीअर, जेनस हेंडरसन, नाईन्टी वन या परदेशी टेक पंपन्यांचाही समावेश आहे. हा आयपीओ सर्वसामान्यांसाठी 21 ऑक्टोबर रोजी खुला होणार असून त्यात 27 कोटी शेअर्ससाठी बोली मागवण्यात येणार आहे. एका शेअरसाठी 1,065 ते 1,119 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली आहे.
Comments are closed.