माथेरान मिनी बसचा धोकादायक प्रवास,  35 जणांची क्षमता असलेल्या बसमध्ये 70 जणांची कोंबाकोंबी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माथेरानला जाणाऱ्या मिनी बसमधून धोकादायक प्रवास सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जत येथून प्रवाशांना घेऊन माथेरानच्या दिशेने निघालेली मिनी बस नेरळ येथील निर्धारित थांब्यावर न थांबता थेट माथेरानला गेली. धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये ३५ प्रवाशांची क्षमता असताना तब्बल ७० प्रवासी कोंबले होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

माथेरानचा घाटरस्ता हा तीव्र चढ, अवघड वळणे आणि उतांरासाठी ओळखला जातो. अशा मार्गावर बसच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जात असतील तर संभाव्य अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ३५ प्रवासी क्षमता असलेल्या बसमध्ये ७० प्रवासी कसे घेतले याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. नेरळ खांडा येथील बसथांब्यावर बस न आल्याने येथील प्रवाशांना माथेरानला जाण्यासाठी पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यानंतर काही प्रवाशांनी टॅक्सीने जाताना घाटमार्गावर हीच मिनी बस दिसल्याने चालक आणि वाहकाला ज्येष्ठ नागरिकांनी जाब विचारला असता चालकाने प्रवाशांशी अरेरावी केली.

वारंवार तांत्रिक बिघाड

माथेरानच्या घाटात मिनी बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे आणि प्रवाशांची गैरसोय होणे असे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. 14 ऑक्टोबर रोजी घाटात मिनी बसचे ब्रेक निकामी झाल्याने आणि इंजिनमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली होती.

Comments are closed.