हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट; 'इतके' महिने राहणार क्रिकेटपासून दूर, थेट आयपीएल 2027 मध्येच…

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तो सध्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पायाच्या दुखापतीतून सावरत आहे. तो शेवटचा आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसला होता, तर भारतासाठी शेवटचा सामना मार्च २०२६ मध्ये खेळला. इतके दिवस बाहेर असूनसुद्धा त्याची मैदानावर परतण्याची शक्यता कमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकला असून काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याचे पुनरागमन थेट आयपीएल (IPL) २०२७ मध्येच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दैनिक जागरनमधील वृत्तानुसार, तो दुखापतीतून सावरत असून ३ आठवड्यांत जॉगिंग सुरू करू शकेल, त्यानंतर ८ आठवड्यांपर्यंत हळूहळू त्याच्या धावण्याचा सराव वाढवला जाईल.

तसेच हार्दिक पूर्णपणे फिट होऊन कधी मैदानात उतरेल, याबाबत कोणतीही निश्चित कालमर्यादा दिलेली नाही. दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेमुळे तो आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकण्याची शक्यता आहे. (Hardik Pandya could now make his direct return in competitive cricket in IPL 2027)

Comments are closed.