मनोज जरांगेंच्या आरोपावर फडणवीस गप्प का? ते कुणाची मजा बघत आहेत? संजय राऊत यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचा बॉम्ब दसरा मेळाव्यात फोडला. शिंदे यांनी नोज जरांगे यांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत असे सांगून भाजपकडून पैसे उचलले अशी दिल्लीत भाजपच्या नेत्यांत कुजबुज आहे. त्यामुळे खरं काय ते सांगा नाहीतर मला खोलात जावं लागेल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

”आम्ही सत्तेत असताना 2021 ला जे काही झालं ते लॉरेन्स बिष्णोईने केलं. हे सगळे लॉरेन्स बिष्णोईचे साथिदार आहेत. काल जे शिवसेनेचं बोर्ड लावून बोलत होते ते छोटे लॉरेन्स बिष्णोई आहेत. मोठे लॉरेन्स बिष्णोई गुजरात व दिल्लीत आहे. त्यांच्या धमक्या, ताकद, गोळ्यांच्या जोरावर झालेले हे सत्तांतर आहे. ते मतांच्या जोरावर झालेले सत्तांतर नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

”मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर 5०० कोटी खाल्ल्याचा आरोप केला त्यावर बोललं पाहिजे. भाजपकडून मनोज जरांगे पाटील यांना गप्प करण्यासाठी जो माणूस 500 कोटी उचलतो असा आरोप जरांगे म्हणतायत त्याची लायकी काय? मग ते 500 कोटी कुठे गेले? तसंच 500 कोटी देणारा तो भाजपचा नेता कोण? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

”परमबीर सिंग यांच्या एका आरोपानंतर अनिल देशमुखांना अटक केली होती. सीबीआय, ईडी आली होती. मनोज जरांगे पाटील ज्यांच्यासोबत सरकार चर्चा करतेय ते जरांगे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करतायत. त्यामुळे याची चौकशी ईडीने केली पाहिजे. एकनाथ शिंदेना समन्स पाठवायला पाहिजे. जर गृहमंत्री असताना अनिल देशमुखांना समन्स पाठवले गेले. तर आता देवेंद्र फडणवीस का गप्प बसले आहेत. ते कुणाची मजा बघतायत? भाजपचा जो नेता आहे त्याबाबत जरांगेकडे पुरावे आहेत. याचा एफआयआर व्हायला हवा. जर या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि याची त्यांना जाणीव असेल तर या पाचशे कोटीच्या आरोपाबाबत ताबडतोब गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे देणं गरजेचं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हायला हवी”, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.