स्वतः गाडी चालवत मास्टर ब्लास्टर पोहचला रिळ गावात, गणपतीपुळ्यात घेतले बाप्पांचे दर्शन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्वतः गाडी चालवत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल शनिवारी रात्री रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावात पोहचला. पहिल्यांदाच त्याने कोकणचा समुद्रकिनारा आणि निसर्ग सौंदर्य गाडी चालवत अनुभवले. आज दुपारी त्याने गणपतीपुळ्यात बाप्पाचे दर्शन घेतले आणि तो पुन्हा मुंबईकडे स्वता गाडी चालवत रवाना झाला.

माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांचे निवासस्थान रिळ गावात आहे. रिळ गावाजवळ प्रवीण अमरे यांनी नवीन एकर्स ऑफ हॅप्पीनेस कोकण किनारा हे रिसॉर्ट सुरू केले आहे. ते पहाण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज रिळ गावात आले होते. काल रात्री प्रवीण अमरे यांच्या घरी मुक्काम केल्यानंतर तर रिळ गावातील वीर भराडी देवीच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी १२ वाजता सचिन तेंडुलकर प्रवीण अमरे यांच्या सोबत गणपतीपुळे मंदिरात पोहचले. त्याठिकाणी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

Comments are closed.